बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 7 एप्रिल 2018 (10:59 IST)

वेबसाईट हॅक की हार्डवेअरमधील बिघाड ?

भारतीय संरक्षण मंत्रालयाची वेबसाईट हॅक झाली आहे. या वेबसाईटवर चीनी लिपीतील अक्षरं आढळली आहेत. त्यामुळे चीनी हॅकर्सने हे कृत्य केल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय संरक्षण मंत्रालयाची https://mod.gov.in ही वेबसाईट हॅक करण्यात आली आहे.  या प्रकरणी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
 
दुसरीकडे सरकारी वेबसाईट डाऊन होण्यामागे सायबर हल्ल्याचे वृत्त भारताच्या सायबर सिक्युरिटी प्रमुखांनी फेटाळले आहे. हार्डवेअरमधील बिघाडमुळे वेबसाईट डाऊन झाली होती, असे त्यांनी सांगितले. कोणत्याही सरकारी वेबसाईटवर हल्ला झालेला नाही व कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. ही हार्डवेअरची समस्या होती. त्यामुळे सुमारे १० सरकारी वेबसाईट प्रभावित झाल्या. 
 
सरकारी वेबसाईटची देखभाल करणाऱ्या राष्ट्रीय सूचना केंद्राच्या (एनआयसी) अधिकाऱ्यांनीही स्पष्ट केले की संरक्षण मंत्रालय आणि इतर मंत्रालयाच्या वेबसाईट हॅक झाल्या नव्हत्या आणि कोणत्याही प्रकारचा सायबर हल्ला झालेला नाही. तांत्रिक गडबडीमुळे संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, निवडणूक आयोग, इपीएफओ, श्रम मंत्रालयसह सुमारे १० सरकारी वेबसाईट डाऊन झाल्या होत्या.