मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बंगळुरु , शुक्रवार, 1 ऑक्टोबर 2021 (16:43 IST)

ही आहे जगातिल सर्वांत महागडी कॉफी

आज आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस आहे. या दिवशी आज आम्ही तुम्हाला कॉफी लुवाक या कॉफीची माहिती देणार आहोत. या कॉफीचा एक कप अमेरिकेत सुमारे १२० डॉलरपर्यंत मिळतो. भारतीय चलनात याची किंमत मोजायची असेल तर एक कप कॉफिसाठी तुम्हाला ५ ते ६ हजार रुपये मोजावे लागतील. दक्षिण भारतात कर्नाटक राज्यात या कॉफीचे उत्पन्न घेतले जाते.
 
या कॉफीचे वैशिष्ट्य म्हणजे सिव्हेट नावाच्या मांजराच्या विष्ठेपासून ही कॉफी तयार केली जाते. या मांजराची शेपटी लांब असते. विशेष म्हणजे या मांजराला कॉफीची फळं खुप आवडतात. कच्ची असतानाच हे मांजर कॉफीची कच्ची फळं खातं. या फळाचा गर मांजराला खाता येतो. पण कॉफिचं संपूर्ण फळं पचवणं या मांजराला शक्य नसतं. त्यामुळे न पचलेलं फळ मांजराच्या विष्ठेतून बाहेर येतं. याचाच वापर कॉफी तयार करण्यासाठी केला जातो.
 
ही न पचलेली फळं गोळा केली जातात. त्यांच्यावर कॉफीच्या कारखान्यात प्रक्रिया केली जाते. त्यानंतर त्यापासून चविष्ट अशी कॉफी लुवाक तयार केली जाते. मांजराच्या पाचनसंस्थेतून कॉफीची फळं गेल्यानंतर त्याची चव बदलते. त्यापासून तयार केलेल्या कॉफीला चांगली चव येते असा कॉफी प्रेमींचा समज आहे.
 
कर्नाटक राज्यातील कुर्ग या जिल्ह्यात सिव्हेट कॉफी तयार केली जाते. इंडोनेशियासह काही दक्षिण आशियायी देशातही या कॉफीचं उत्पन्न घेतलं जातं.