बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 24 नोव्हेंबर 2018 (16:31 IST)

मुंबईत सायंकाळी श्रीरामाचा जयजयकार, घंटानाद आणि महाआरती

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी संध्याकाळी शरयूच्या किनार्‍यावर ते महाआरती करतील. मुंबईतही शनिवारी सायंकाळी श्रीरामाचा जयजयकार करत घंटानाद आणि महाआरती केली जाणार आहे. मुंबई शहरात शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. मुंबईतील शिवसेनेच्या 227 शाखांनी आपल्या विभागात असलेल्या एका मंदिराच्या ठिकाणी महाआरती करावी, असे नियोजन आधी करण्यात आले होते. मात्र, महाआरतीला उपस्थिती जास्त नसेल तरीही, वेगळा संदेश जाऊ शकतो याकरता मुंबई शहरातील बारा शिवसेना विभागप्रमुखांना त्यांच्या विधानसभा मतदारसंघात शनिवारी  महाआरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.