२ लाख मोबाईलधारकांनी 'नमो अॅप' डाऊनलोड केले
पंतप्रधानांच्या नमो अॅपमधून डेटा चोरीच्या आरोपांनंतर तब्बल २ लाख मोबाईल धारकांनी हे अॅप डाऊनलोड केल्याचा दावा भाजपनं केलाय. दुसरेकडे काँग्रेसनं सध्या सोशल मीडियावर डिलीट नमो अॅप नावाचं एक कॅम्पेन सुरू केलंय. भाजपने दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या खासदारांसोबत झालेल्या एका बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व खासदारांनी जनतेशी थेट संपर्कावर भर देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याअंतर्गत पक्षानं नमो अॅपच्या प्रसाराची एक खास मोहिम आखली होती. पण त्यातच मधल्या काळात डेटा चोरीचं प्रकरण पुढे आलं. आणि आता काँग्रेसनं #डिलीटनमोअॅप या हॅश टॅगसह विरोधी मोहीम सुरु केली.