सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 26 मार्च 2018 (15:36 IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थ्रीडी अवतार देत आहे योगाची शिक्षा (वीडियो)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ फारच वायरल होत आहे. यात मोदी योग करताना दाखवण्यात आले  आहे. हा व्हिडिओ थ्रीडी ऍनिमेशनमध्ये बनवण्यात आला आहे आणि मोदी यांचे ऍनिमेशन स्ट्रक्चर योग करताना दिसत आहे. या व्हिडिओत त्रिकोणासनाबद्दल सांगण्यात आले आहे, तसेच त्रिकोणासन करण्याबद्दल टिप्स देखील देण्यात आले आहे.  
 
या व्हिडिओला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओत त्रिकोणासन करण्याची योग्य पद्धत सांगण्यात आली आहे ज्याने तुम्ही योग्य प्रकारे योगा करू शकता. व्हिडिओत एक वॉइस ओवर देखील आहे. त्यात या आसनाबद्दल व याचे फायदे देखील सांगण्यात आले आहे.

महत्त्वाचे म्हणजे नरेंद्र मोदी देशच नव्हेतर, संपूर्ण जगात योगाद्वारे जुळलेले आहे. यात पहिल्यावर्षी 2014मध्ये सरकार आल्यानंतर त्यांनी संयुक्त राष्ट्रात 21 जूनला 'आंतरराष्ट्रीय योग दिवस'च्या स्वरूपात साजरा करण्याचा सल्ला दिला होता ज्याला 3 महिन्यातच रिकॉर्ड मतांद्वारे स्वीकार करण्यात आला होता. त्याशिवाय पंतप्रधान या दिवशी राजपथावर देशवासीयांसोबत योग करताना देखील दिसले आहे.