शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

अमेझॉन विरुद्ध खटला दाखल, विकत आहे हिंदू देवी-देवता अंकित टॉयलेट कव्हर

ऑनलाईन कंपनी अमेझॉनविरुद्ध नोएडाच्या कोतवाली सेक्टर-58 मध्ये खटला दाखल केला गेला आहे. कंपनीने वेबसाइटवर प्रॉडक्टसह असे फोटो टाकले आहे ज्याने हिंदू भावना दुखावल्या जाण्याचा आरोप आहे.
 
खोडा रहिवासी विकास मिश्राद्वारे खटला पंजीकृत करण्यात आला आहे. विकास मिश्र यांच्याप्रमाणे अमेझॉन कंपनी ऑनलाईन व्यवसाय करते. या कंपनीने आपल्या साईटवर अशा वस्तूंचे फोटो टाकले आहे ज्यामुळे हिंदू लोक दुखावले जात आहे.
 
यामुळे देशात धार्मिक ताण वाढू शकतो. यानंतर देश भी धार्मिक पैदा हो । यानंतर पोलिसांनी अमेझॉनच्या स्थानीय वेंडरला बोलावून माहिती घेतली. नंतर खटला दाखल करण्यात आला.
 
आपण अमेझॉन.कॉम वर विजिट करून टॉयलेट कव्हर इंडियन गॉड असे टाइप कराल तर आपल्याला असे अनेक कव्हर सापडतील ज्यावर हिंदू देवी देवतांचे चित्र अंकित दिसतील. हे कव्हर बाथरूममध्ये पाय ठेवण्यासाठी किंवा टायलेट सीट कव्हरच्या रूपात वापरण्यात येऊ शकतात.
 
10 डॉलर सुरुवाती किंमत
या प्रॉडक्ट्सची किंमत 10 डॉलरहून सुरू होत 220 डॉलर पर्यंत आहे. आपण परदेशात असल्यास हे प्रॉडक्ट्स सहज खरेदी करू शकता. भारतात या प्रॉडक्ट्सची डिलेव्हरी होत नाही.
 
गणपतीचं टॉयलेट स्टिकर
गणपतीचं चित्र अंकित टॉयलेट सीटवर लावण्यासाठी उपयोगी स्टिकर केवळ 10 डॉलरमध्ये उपलब्ध आहे. हे स्टिकर चीनमध्ये तयार केले जात आहे आणि तेथूनच याची डिलेव्हरी देखील होतेय. याचा आकार 8*11 असा आहे. लोकांना यासाठी अतिरिक्त इंपोर्ट फीस आणि इतर शुल्क द्यावं लागतं.
 
यावर सर्वात महाग प्रॉडक्ट प्रभू जगन्नाथ यांचे चित्र अंकित फ्लोअर कार्पेटचे आहे. याची किंमत 220 डॉलर आहे. यावर मुलं आरामात खेळू शकतात अशी याची विशेषता सांगण्यात आली असून याचा आकार 200*300 सेमी असा आहे.
 
अमेझॉन.कॉमवर असे प्रॉडक्ट्स विकले जात असल्याचा आधीही विरोध झाला आहे. यापूर्वी महात्मा गांधींचे चित्र असलेल्या चपला आणि फ्लोअर मॅट विकले जात होते. काही वर्षांपूर्वी देखील असंच प्रकरण समोर आलं होतं जेव्हा देवी देवतांचे चित्र असलेले डोर मॅट देखील अमेझॉनच्या साईटवर उपलब्ध होते. नंतर विरोधामुळे कंपनीला वेबसाइटवरून प्रॉडक्ट्स हटवावे लागले होते.