मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 एप्रिल 2020 (21:51 IST)

'या' सर्व क्षणांची विक्रमी नोंद झाली

पंतप्रधांनी लॉकडाऊनचा पहिला टप्पा संपत असतानाच अखेरच्या दिवशी लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्याची अधिकृत घोषणा केली. देशातील नागरिकांना संबोधित करत त्यांनी ही महत्त्वाची घोषणा केली. या सर्व क्षणांची विक्रमी नोंद झाली आहे. 
 
BARC कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार पंतप्रधानांनी दुसऱ्यांचा जेव्हा लॉकडाऊनची घोषणा केली आणि देशाला संबोधित केलं, तेव्हा एकाच वेळी २०.३ कोटींहून अधिक नागरिकांनी त्यांचा हा संदेश एकाच वेळी पाहिला. परिणामी मोदींचा एक जुना विक्रमही मोडित निघाला. 
 
आतापर्यंत कोरोना विषाणूशी लढतेवेळी पंतप्रधानांनी एकूण चार वेळा देशाला संबोधित केलं आहे. लॉकडाऊनची पहिल्यांदाच घोषणा केली गेली जेव्हा जवळपास १९.३ कोटी नागरिकांनी मोदींचं हे संबोधनपर भाषण पाहिलं होतं. पण, चौथ्यांदा केलेल्या संबोधनाला मात्र देशवासियांनी चांगलाच प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं.