बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 17 नोव्हेंबर 2018 (15:57 IST)

पुलंच्या घरी जाऊन मी गहिवरलो : सचिन तेंडुलकर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नुकतीच पुलंच्या पुण्यातील घराला भेट दिली. सामान्य माणसाशी सहज सोडून घेता येईल असं पुलंचं व्यक्तिमत्व होतं, अशी भावना यावेळी सचिनने व्यक्त केली. पुलंच्या घरी जाऊन मी गहिवरलो आणि भावूक झालो असंही सचिनने सांगतिलं. सर डॉन ब्रॅडमन यांच्या वाढदिवसासाठी त्यांच्या घरी गेल्यावर मला जेवढा आनंद झला होता, तेवढाच आनंद मला पुलंच्या घरी जाऊन झाल्याच्या भावना सचिनने व्यक्त केल्या. पु.लंच्या पुण्यातील भांडारकर रोडवर असलेल्या घराला त्यांनी भेट दिली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. पु.ल.देशपांडेच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त सचिनच्या हस्ते ‘आय लव्ह पुलं’ (मी पुलं प्रेमी) या कार्यक्रमाच्या लोगोचं आणि पुलोत्सव पुणे या कार्यक्रमाच्या लोगोचं अनावरणही करण्यात आलं.