सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 डिसेंबर 2018 (08:56 IST)

सलमान खान सलग तिसऱ्यांदा फोर्ब्सच्या यादीत पहिला

फोर्ब्सने 100 श्रीमंत भारतीय सेलिब्रेटींची यादी जाहीर केली असून  सलमान खानने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. सलमान खान सलग तिसऱ्यांदा फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंत भारतीय सेलिब्रिटीजच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आला आहे. विशेष म्हणजे बॉलिवूड किंग शाहरुख खानला पहिल्या 10 मध्येही स्थान मिळू शकलेलं नाही.
 
अभिनेत्यांनी केलेल्या कमाईच्या आधारे फोर्ब्सकडून ही यादी जाहीर केली जाते. ही यादी जाहीर करण्यासाठी फोर्ब्सने 1 ऑक्टोबर 2017 ते 30 सप्टेंबर 2018 दरम्यान अभिनेत्यांनी केलेल्या कमाईच्या आकड्याची दखल घेतली आहे.
 
2018 मध्ये सलमान खानने कमाईच्या बाबतीत बॉलीवुडमधील सर्व अभिनेत्यांना मागे टाकले असून तब्बल 253.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यादीत दुसरा क्रमांक लागला आहे तो भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा. अक्षय कुमार 185 कोटींसहित तिसऱ्या क्रमांकावर आहे. नुकतंच लग्न झालेल्या दीपिकाने पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवलं असून 112.8 कोटींची कमाई करत भारतातील पहिली सर्वाधिक कमाई करणारी महिला सेलिब्रिटी ठरली आहे. दीपिका चौथ्या क्रमांकावर आहे. यानंतर महेंद्रसिंह धोनीचा क्रमांक असून त्याने 101.77 कोटींची कमाई केली आहे. यानंतर अनुक्रमे आमीर खान (97.50), अमिताभ बच्चन (96.17), रणवीर सिंह (84.7), सचिन तेंडुलकर (80) आणि अजय देवगण (74.50) यांचा क्रमांक आहे.