बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 13 जून 2018 (15:05 IST)

भय्यूजी महाराज यांच्या सुसाईड नोटचे दुसरे पान उघड झाले

आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी आयुष्यातील तणावाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट त्यांच्या खासगी पॉकेट डायरीत लिहून ठेवली होती. आता या सुसाईड नोटचे दुसरे पान उघड झाले आहे. त्यात त्यांनी सूर्योदय परिवार आणि त्यांच्या आश्रमाची सर्व जबाबदारी त्यांचा सेवक विनायक कडे देण्यास सांगितले आहे. माझ्या सर्व आश्रम व त्याच्या संबंधित गोष्टींचे सर्व व्यवहार हे माझा सेवक विनायककडे द्या. माझ्यानंतर तोच हे सर्व व्यवहार योग्य प्रकारे सांभाळू शकेल, असे भय्यूजी महाराज यांनी त्यांच्या सुसाईड नोटच्या दुसऱ्या पानावर लिहले आहे.
 
विनायक हा गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ भय्यूजी महाराज यांचा खास सेवक आहे. भय्यूजी महाराजांनी जेव्हा स्वत:वर गोळी झाडली त्यावेळी विनायकनेच त्यांच्या खोलीचे दार तोडले व नंतर त्यांना रुग्णालयात घेऊन आला.