बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 21 जून 2023 (18:00 IST)

Leopard Surya Namaskar सूर्य नमस्कार करणारा बिबट्या सोशल मीडियावर व्हायरल

Surya Namaskar by the leopard योग आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात त्याचा समावेश करतात. योगाचे महत्त्व बघता दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय जागतिक योग दिन साजरा केला जातो. योगाचा उगम भारतात झाला. योगामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक फायद्यांमुळे जगभरात लोकप्रियता मिळाली आहे.
 
तसेच जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करत असताना या निमित्ताने सोशल मीडियावर अनेक जण योगा करतानाचे व्हिडिओ पोस्ट करत आहे पण तुम्ही कधी एखाद्या प्राण्याला योगा करताना पाहिले आहे का? जर असे कधी बघितले नसेल तर सध्या सोशल मीडियावर एक अतिशय सुंदर व्हिडिओ व्हायरल होत आहे. या दुर्मिळ व्हिडीओमध्ये एक बिबट्या अशा प्रकारे ताणून आपल्या शरीराची हालचाल करत आहे की, तो सूर्य नमस्कार करत असल्याचे भासत आहे असे लोकांचे म्हणणे आहे.
 
तुम्हालाही विश्वास बसत नसेल तर तुम्ही या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता. हा व्हिडिओ थोडा जुना आहे कारण तो काही महिन्यांपूर्वी एका IFS अधिकाऱ्याने पोस्ट केला होता. हा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.