शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

काय म्हणता, पृथ्वीचा दुसरा चंद्र सापडला

पृथ्वीचा दुसरा चंद्र शोधल्याचा दावा अमेरिकेतील संशोधकांनी केला आहे. संशोधकांनी पृथ्वीच्या दुसऱ्या चंद्राला २०२० सीडी थ्री असं नाव दिलं आहे. मागील तीन वर्षांपासून हा अगदी लहानश्या आकाराचा चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत आहेत. अमेरिकेतील अॅरेझॉना येथील कॅटालीना स्काय सर्व्हे येथील संशोधकांनी या चंद्राचा शोध लावला आहे. १९ फेब्रुवारी रोजी येथील संशोधकांना हा चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना दिसला. याआधीही संशोधकांना हा चंद्र सहा वेळा दिसला होता. त्यामुळे हा पृथ्वीचा मीनी मून असण्यावर संशोधकांनी शिक्कामोर्तब केला आहे. हा चंद्र १.९ मीटर लांब आणि ३.५ मीटर रुंद आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर तो एका लहान गाडीच्या आकाराचा आहे.
 
“पृथ्वीला एक तात्पुरता चंद्र मिळाला आहे. त्याचं नाव आहे ‘२०२० सीडी थ्री’. १५ फेब्रुवारीच्या रात्री मी कॅटालीना स्काय सर्व्हे येथे माझ्याबरोबर काम करणाऱ्या टेडी प्रुयेनीसोबत या चंद्राचा शोध लावला,” असं ट्विट खगोल अभ्यासक असणाऱ्या कॅस्पर विर्झेकोस याने केलं आहे.