बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 23 मार्च 2024 (15:41 IST)

पंकजा मुंडे यांना मराठा समाजाने दाखवले काळे झेंडे

pankaja munde
लोकसभा निवडणुकांच्या तारख्या जाहीर करण्यात आल्या आहे.सध्या पंकजामुंडे यांनी प्रचाराला सुरुवात केली असून त्या गावोगावी भेट देत आहे. भाजपच्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना प्रचारादरम्यान मराठा समाजाच्या बांधवांच्या रोषाला समोरी जावे लागले.त्या आज धाकटी पंढरी श्री क्षेत्र संस्था नारायणगावातील श्रीनगर नारायण महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या.त्या दर्शन घेऊन परत जाताना त्यांना साक्षाळ  पिंपरी येथे काही मराठा बांधवांनी काळे झेंडे दाखवले आणि एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली. या वेळी पंकजा मुंडे यांचा ताफा न थांबता निघाला. 

या पूर्वी सोलापूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना देखील प्रचार दौऱ्यामध्ये मराठा समाजाच्या बांधवांकडून विरोध होताना दिसला. या विरोध मागे भाजप असल्याचे त्यांनी म्हटले. त्यावर भाजपच्या किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माउली हळणवर म्हणाले की प्रणिती शिंदे यांनी आरोप सिद्ध करून दाखवावे. नाही तर त्यांनी  माफी मागावी. असं केले नाही तर त्यांना मतदारसंघात फिरू देणार नाही.  
आज आता पंकजा मुंडे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. 

Edited by - Priya Dixit