रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह कोटेशन
Written By वेबदुनिया|

प्रेमात पडलेल्यांची लक्षणं.....

प्रत्येकच वस्तु मधे तिचा चेहेरा दिसु लागतो. जिथे पहावं तिथे ती आहे असा भास होतो.

एकदा तिच्याशी फोन वर बोलणं सुरु झालं की ते कधी संपुच नये असं वाटतं. फोन ठेवतांना तिने फोन बंद केल्याशिवाय तुम्ही हॅंग करित नाही.

स्टॅग पार्टीला जाउन मित्रांबरोबर मस्ती करण्यापेक्षा तिच्या बरोबर पेटीकोट, भाजी, ओढणी सारख्या फालतु गोष्टी शॉपिंगला जाणं तुम्हाला जास्त महत्वाचं वाटू लागतं.

तिच्या बरोबर अगदी रडूबाई सिनेमा पण तुम्ही आवडिने पहाण्यास तयार असता. प्रसंगी न कळणाऱ्या भाषेतिल चित्रपट जसे शंकराभरणम वगैरे पण तुम्ही ’आवडीने’ पहाता.

क्लास मधे शिकवत असतांना लेक्चरर पेक्षा तिच्या कडे जास्त लक्ष जातं.

तिचे मित्र मैत्रीणी आपले पण मित्र व्हावेत म्हणुन तुम्ही पदरचे पैसे खर्च करायला पण तयार होता. केवळ तिचा सहवास लाभावा म्हणुन..

जिच्यावर प्रेम आहे तिच्या व्यतिरिक्त जगातिल प्रत्येकच मुलगी दिसायला ’तिच्यपेक्षा डावी’ दिसु लागते. मग यामधे ऐश्वर्या रायचा फोटो जरी समोर ठेवला, तर ऐश्वर्याचं पण नाक वाकडं दिसु लागतं..