'राक्षस' सिनेमाची कथा सातासमुद्रा पार

rakshas marathi movie
Last Modified गुरूवार, 26 नोव्हेंबर 2015 (14:38 IST)
दर्जेदार सकस आणि मनोरंजनाने परिपूर्ण सिनेमे तयार करण्यात हातखंड असलेल्या नवलखा आर्ट्स आणि होली बेसिल प्रॉडक्शन हाउस निर्मित 'राक्षस' हा आणखी एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाला २३ नोव्हेंबर पासून सुरवात झाली आहे. राक्षस सिनेमाच्या निमित्ताने मराठी चित्रपटातील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता शरद केळकर यांची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. खलनायकाची भूमिका करूनही महाराष्ट्राचा फेव्हरेट झालेला संग्राम म्हणजेच शरद या 'राक्षस' सिनेमात सकारात्मक भूमिकेत आहे.
सिनेमाचा जॉनर काहीसा फॅमिली थ्रिलर आहे. त्यात एंटरटेनमेंट सोबत सस्पेन्स, थ्रिलर आणि इमोशन ड्रामा असलेला फॅमिली एंटरटेनिंग सिनेमा पाहायला मिळेल. त्यामुळे येत्या वर्षातील हा अप्रतिम सिनेमा ठरेल. सिनेमाची कथा कौटुंबिक भावनिक दर्शन घडवणारी आहे. बालकलाकार ऋजुता देशपांडे साकारत असलेली मुन्नी ही व्यक्तिरेखा सिनेमात महत्वाची भूमिका बजावते. 'शाळा', 'फॅंड्री', 'सिद्धांत' या सिनेमाच्या यशानंतर निलेश नवलखा आणि विवेक कजारिया यांची निर्मिती असलेले 'चौर्य', 'राक्षस' आणि 'एक नंबर' हे सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. सिनेमाची कथा आणि दिग्दर्शन ज्ञानेश झोटिंग यांचं असणार आहे. नवलखा आर्ट्स आणि होली बेसिल प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या सिनेमांचे विशेष म्हणजे आज पर्यंत ९ सिनेमांपैकी ७ दिग्दर्शकांना पदार्पणातील सिनेमा करायची संधी नवलखा आर्ट्स आणि होली बेसिल प्रॉडक्शन हाउसने दिली आहे. 'शाळा'चे सुजय डहाके, सिद्धांतचे विवेक वाघ,
'फॅंड्री'चे नागराज मंजुळे हि नावे प्रामुख्याने घेता येईल. 'राक्षस' हा सिनेमा शूट होण्याआधीच सिनेमाची कथा जगातील प्रसिद्ध आणि नामांकित दृश्यम संडन्स रायटर्स लॅबमध्ये निवड झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर राक्षसची चर्चा आधीपासून आहे. येत्या काही दिवसात तो आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजेल याबद्दल संपूर्ण
खात्री नवलखा आर्ट्स आणि होली बेसिल प्रॉडक्शनला आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

Radhe: ईदवर सलमान खानला रिटर्न गिफ्ट मिळाले, राधेने ...

Radhe: ईदवर सलमान खानला रिटर्न गिफ्ट मिळाले, राधेने पहिल्याच दिवशी रिकॉर्ड केला
यंदाच्या ईदच्या निमित्ताने सलमान खानने 'राधे' चित्रपटाद्वारे आपल्या चाहत्यांना एक खास भेट ...

कोरोना योद्धांना 'प्लॅनेट मराठीचा सलाम'

कोरोना योद्धांना 'प्लॅनेट मराठीचा सलाम'
१३ मे २०१७ रोजी अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी प्लॅनेट मराठी या पहिल्या मराठी ओटीटी ...

देशात मूर्खांची कमी नाही : स्वरा भास्कर

देशात मूर्खांची कमी नाही : स्वरा भास्कर
देशात कोरोनाचा कहर सुरुच असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे ...

तेथे मोजकेच बोलतात

तेथे मोजकेच बोलतात
एक माणूस वॅक्सीन घ्यायला जातो, खूप बडबड करत असतो... "डॉक्टर, दुखेल का?

प्रतिमा निर्मितीपेक्षा यात आणखी बरेच काही ...

प्रतिमा निर्मितीपेक्षा यात आणखी बरेच काही आहे....कोरोनाबद्दल अनुपम खेर यांनी केली मोदी सरकारवर टीका
भारतातील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या प्रादुर्भावामुळे खळबळ उडाली आहे. ऑक्सिजनच्या ...