शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: बुधवार, 25 सप्टेंबर 2024 (19:04 IST)

भाजपचे आमदार टेकचंद सावरकर यांचे लाडकी बहीण योजनेवर वादग्रस्त विधान, विजय वडेट्टीवार यांची टीका

Vijay-Wadettiwar
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका वर्षाच्या अखेरीस होणार असून सध्या लाडकी बहीण योजनेवर भाजपच्या आमदाराने वादग्रस्त विधान दिले आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

त्यात नागपूरच्या कामठी विधानसभा मतदार संघातील भाजपचे आमदार टेकचंद सावरकर म्हणताना दिसत आहे की, आम्ही माझी लाडकी बहीण योजनेचा जुगाड मतांसाठी घातला आहे. निवडणुका असतील तेव्हा लाडक्या बहिणी कमळाला मत देतील.म्हणून योजनेचे जुगाड करण्यात आले आहे असे विधान टेकचंद सावरकरांनी दिल्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला असून राजकीय चर्चाला उधाण आले आहे. 22  सप्टेंबर रोजी नागपुरात महिला मेळाव्यात बोलताना त्यांनी हे वादग्रस्त विधान दिले. त्यांचा हा व्हिडीओ विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी शेअर केला आहे.  
 
या व्हिडीओ मध्ये आमदार टेकचंद सावरकर हिंदीत भाषण करताना दिसत आहे ते म्हणतात आम्ही इतना भानगड किसके लिये किया है, इमानदारीसे बटण. इसलिये किया की जब बहानॊ के सामने मतपेटी आयेगी तो हमारी लाडकी बहीण कमल को वोट देणार. या वर विजय वड्डेटीवार म्हणाले, 
 
भाजपच्या या आमदाराने मान्य केलं की महायुतीतील सर्व नेते खोटं बोलतात. लाडकी बहिण योजना माता भगिनींना लाभ देण्यासाठी नव्हे तर मत पेटीतून लाभ घेण्यासाठी आहे. 

या विधानावरून विरोधी पक्षाचे नेत्यांनी महायुती  सरकारला घेरले आहे. वडेट्टीवार म्हणाले, अखेर महायुतीची भानगड समोर आली. मताचा लाभ मिळवण्यासाठी त्यांनी ही योजना सुरु केली असे त्यांच्या नेत्याने मान्य केले आहे. अशी टीका विजय वड्डेटीवार यांनी महायुतीवर केली आहे. 
Edited By - Priya Dixit