सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Updated : मंगळवार, 29 ऑक्टोबर 2024 (09:23 IST)

मनसेची 10 उमेदवारांची 7वी यादी जाहीर

आज सर्व उमेदवार आपापल्या विधानसभा जागांवर निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून सोमवारी रात्री महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 10 उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. आतापर्यंत जवळपास सर्वच पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहे. मंगळवार, 29 ऑक्टोबर रोजी सर्व उमेदवारांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
 
याकरिता आज सर्व उमेदवार आपापल्या विधानसभा जागांवर निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तसेच सोमवारी रात्री उशिरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 10 उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आहे.
 
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बाळापूरमधून मंगेश गाडगे, मूर्तिजापूरमधून भिकाजी अवचार, वाशीममधून गजानन वैरागडे, हिंगणघाटमधून सतीश चौधरी, उमरखेडमधून राजेंद्र नजरधने यांना उमेदवारी दिली.
 
याशिवाय आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने औरंगाबाद मध्यमधून सुहास अनंत दाशरथे, नांदगावमधून अकबर शमीम सोनावाला, इगतपुरीतून काशिनाथ मेंगड, डहाणूतून विजय वढिया आणि येसरमधून शैलेश भुतकडे यांना उमेदवारी दिली आहे.