सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: शनिवार, 26 ऑक्टोबर 2024 (09:34 IST)

शिवसेना यूबीटीची 15 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

महाविकास आघाडीमध्ये शिवसेना-यूबीटी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी-शरद पवार यांच्यात 85-85-85असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून आज शिवसेना-यूबीटीच्या दुसऱ्या यादीत 15 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना-यूबीटीने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत 15 उमेदवारांची नावे आहे. या यादीत 4 मोठ्या नावांचाही समावेश आहे. तसेच अजय चौधरी यांना शिवडी मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. मनोज जामसुतकर यांना भायखळामधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर कणकवली मतदारसंघातून संदेश पारकर यांना उमेदवारी देण्यात आली असून वडाळा मतदारसंघातून श्रद्धा जाधव यांना तिकीट देण्यात आले आहे.
 
शिवसेना-UBT, काँग्रेस आणि राष्ट्रवादी-शरद पवार यांचा पक्ष महाविकास आघाडी (MVA) एकत्र निवडणूक लढवत आहे. तसेच या तिन्ही पक्षांमध्ये 85-85-85असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. तिन्ही पक्षांनी आपापले उमेदवार उभे करण्यास सुरुवात केली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना-यूबीटीने वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना उमेदवारी दिली असून आदित्य ठाकरे यांनी मागच्या वेळीही याच जागेवरून निवडणूक लढवली होती आणि विजयी झाले होते.

Edited By- Dhanashri Naik