आकाशी पहा अग्निपंखांची नक्षी...

WD
प्लेमिंगोला मराठीत रोहित पक्षी, असेही म्हटले जाते. या पक्षांच्या चार जाती आहेत. भारतात ग्लेटर प्लेमिंगो या जातीचे लाखो पक्षी स्थलांतरित होतात. अमेरिका, युरोप आणि आशिया खंडातून हे पक्षी भारतात येतात आणि विस्तारतात. सुमारे दोन ते तीन महिन्यांचा त्यांचा मुक्काम असतो. या वैशिष्ट्यपूर्ण पक्षांच्या मुक्कामाची जागाही विशिष्ट असते. आकाराने मोठे असणा-या या पक्षांचे खाद्य मात्र, लहान कीटक, जलपर्णी असते. म्हणूनच ज्या पाणवठ्यावर त्यांची आवडती जलपणीँ आणि कीटक आहेत त्याचठिकाणी त्यांचा मुक्काम असतो. हे पक्षी उंच असले तरी भक्ष्य शोधण्यासाठी म्हणून उथळ पाण्यामध्येच त्यांचे थवेच्या दिसून येतात.

स्थलांतरापूर्वी हे पक्षी चोख नियोजन करतात. सुरुवातीस पायलेट पक्षी पाहणी करण्यासाठी निघून जातात आणि जागा निश्चित करतात. त्यानंतर थव्या थव्याने पक्षांचे संमेलनच भरते. धोका जाणवल्यास लगेचच दुस-या तलावावर निघून जाण्यासाठी म्हणून आसपास अनेक तलाव असणा-या भागातच ते मुक्काम करतात. निळ्याशार पाण्यामध्ये पांढ-या आणि गुलाबी छटा असलेल्या या पक्षांचा थवा पाहताना मन भरून येते. या पक्षांची उंची चार ते पाच फूट असते. लांबलचक गुलाबी पाय, पांढ-याशुभ्र पंखाच्या खाली भडक काळी-गुलाबी छटा, उंच मान आणि अणकुचीदार चोच यामुळे हे पक्षी देखणे दिसतात. सूर्योदयापूर्वी या पक्षांचे थवे तलावावर दाखल होतात आणि खाद्य शोधण्याची लगबग सुरू होते. एकमेकांना मानेने ढुशा देत, चिखलात चोच रुतवून ते खाद्य मिळवतात. यावेळी क्व्रा..., क्व्रा.. अशा आवाजाचा गलका करत भक्ष्य पकडणा-या प्लेमिंगोचे दृश्य पाहण्याजोगे असते. उन्ह पडल्यानंतर ते पाण्यातच आराम करतात. ते आपली उंच मान दुमडून पंखांच्या खाली खोचतात. हजारो पक्षी मान खाली घालून नतमस्तक झाल्यासारखेच वाटते. दिवसभर मौज-मस्तीनंतर सूर्यास्तावेळी पुन्हा पक्षी हवेत झेपावतात. एका मागोमाग एक असा शिस्तबध्द उडणा-या या पक्षांचा हा थवा थक्क करणारा असतो.

मुंबईतील शिवणी, ठाण्याची खाडी, एरोली, उरण त्याचबरोबर मायणी, कातरखटाव, रंकाळा आदीं तलावांमध्ये प्लेमिंगोंचे दर्शन घडते. कच्छचे रण हे त्यांच्या विणीच्या हंगामासाठीचे प्रसिद्ध ठिकाण आहे. विणीच्या हंगामात हे पक्षी समुद्राकाठीच घरटी करतात. अंड्यातून बाहेर पडणारी राखाडी रंगाची पिले जन्मजात पोहण्यात तरबेज असतात. त्यांना उडता येऊ लागल्यावर हजारो पक्षांचे थवे परतीच्या प्रवासासाठी आकाशात झेपावतात.

पक्षांचे निरीक्षण कसे कराल -
वेबदुनिया|
निरीक्षणासाठी दुर्बिण आणि आवश्यक असल्यास चांगल्या दर्जाचा कॅमेरा बरोबर घ्यावा. पांढरे अथवा भडक रंगाचे कपडे घालू नयेत. बहुतेक करून लोकवस्तीपासून दूर असणा-या तलावावरच या पक्षांचा रहिवास असतो. माणसांची चाहून लागताच ते सतर्क होतात आणि थवा उडून जातो. या पक्षांच्या शिकारीचे प्रमाण वाढले असल्याने या पक्षांची संध्याही कमी होत आहे. धोका टाळण्यासाठी तलावाच्या मधोमध त्यांचा थवा उतरतो. त्यांचे जवळून निरीक्षण करण्यासाठी जेणेकरून त्यांना आपल्या उपस्थितीची चाहून लागू नये अशा दृष्टीने तलावाकाठी मचाण तयार करून घ्यावे. मोठा आवाज होऊ नये याची काळजी घ्यावी. दुर्बिणीच्या सहाय्याने त्यांचे ‍निरीक्षण करावे.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

एचबीओ अ‍ॅपने सेवा काही काळासाठी मोफत केली

एचबीओ अ‍ॅपने सेवा काही काळासाठी मोफत केली
लॉकडाऊनमुळे प्रेक्षकांना आता आणखी चांगल्या वेब सीरिज आणि चित्रपट पाहता यावे यासाठी एचबीओ ...

थेंबे थेंबे तळे साचे...शाहरुखचं मराठीत ट्विट

थेंबे थेंबे तळे साचे...शाहरुखचं मराठीत ट्विट
करोनाच्या लढाईत आपण एकत्र आहोत, अशी धीर देणारं‍ ट्विट बॉलीवूड बादशाह शाहरुख खानंने केलं ...

हा फोटो का होतोय व्हायरल, कोणत्या चित्रपटाचा आहे जाणून घ्या

हा फोटो का होतोय व्हायरल, कोणत्या चित्रपटाचा आहे जाणून घ्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी देशातील जनतेशी संवाद साधून 5 एप्रिल रोजी ...

रणदीप हुड्डा नेटफ्लिक्सच्या ‘एक्सट्रेक्शन’ मध्ये झळकणार

रणदीप हुड्डा नेटफ्लिक्सच्या ‘एक्सट्रेक्शन’ मध्ये झळकणार
अभिनेता रणदीप हुड्डा नेटफ्लिक्सच्या ‘एक्सट्रेक्शन’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ...

सनी लिओनीला लेस्बियन समजायचा तिचा नवरा

सनी लिओनीला लेस्बियन समजायचा तिचा नवरा
बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनीने एका खुलासा केला आहे. त्यामुळे सनी पुन्हा एकदा चर्चेला ...