बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By

दत्त तिर्थक्षेत्रे

श्री दत्तात्रेय प्रभू आणि त्यांनी मनुष्य रूपामध्ये घेतलेल्या अवतारांची प्रमुख मुळ दत्त तिर्थक्षेत्रे


 
१) माहूर(नांदेड)महाराष्ट्र (MAHUR) - हे क्षेत्र सद्गुरु दत्तात्रेयांचे अवतार स्थान आहे.महासती अनुसयेच्या सत्व परिक्षेसाठी आलेल्या ब्रह्मा,विष्णू आणि महेश यांनी संतुष्ट होऊन महासती अनुसया आणि अत्री ऋषी यांच्या विनंतीस मान देऊन याच ठिकाणी त्यांच्या पुत्राच्या रूपाने दत्त अवतार धारण केला.हे क्षेत्र फार प्राचीन आहे.ह्या क्षेत्रास दत्तात्रेयांचे विश्रांतीस्थान सुध्दा म्हणतात.ह्या ठिकाणी रेणुका मातेचे मूळ शक्ती पीठ सुध्दा आहे.हे स्थान नांदेड जिल्ह्यात येते.नांदेड पासून ११० किमी अंतरावर माहूर हे क्षेत्र आहे.पुण्या,मुंबई कडील भक्तांसाठी औरंगाबाद,जालना,मेहकर,वाशीम,पुसद,माहूर अशी सरळ बससेवा आहे.नांदेड हे मनमाड-हैदराबाद मार्गावरचे महत्त्वाचे रेल्वे-स्टेशन आहे.या ठिकाणी निवासासाठी भक्तनिवास आहे.
 
 
हे क्षेत्र गुजरात राज्यात सौराष्ट्र प्रांतात जुनागड जिल्ह्यात येते.जुनागड या शहरापासून हे स्थान २ किमी अंतरावर आहे.याच ठिकाणी श्री सद्गुरु दत्तात्रेयांनी गोरक्षनाथास अनुग्रह दिला.हे स्थान उंच पर्वतावर असून या ठिकाणी जाण्यासाठी ९९९९ पायरया चढून जाव्या लागतात.ह्या ठिकाणी सद्गुरु दत्तात्रेयांच्या पादुका स्थापित आहेत.इथे नेहमी दत्तात्रेयांचा निवास असतो याचा प्रत्यय भक्तांना नेहमी येतो.या ठिकाणी जाण्यासाठी सुरत,बडोदा,अहमदाबाद या शहरातून जुनागड (गिरनार)साठी नियमीत बससेवा आहे.रेल्वे-मार्गाने जाण्यारया भक्तांसाठी सुरत,अहमदाबाद,राजकोट,जुनागड अशी रेल्वे सेवा आहे.या ठिकाणी राहण्यासाठी अनेक धर्मशाळा आहेत.