रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. माझा महाराष्ट्र
Written By राकेश रासकर|

माथेरान

हिर्व्या रंगांची सफर

मुंबईपासून एकशे दहा किलोमीटरवर असलेले माथेरान थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. समुद्रसपाटीपासून आठशे मीटर उंचीवर आहे. येथे तीस वेगवेगळी प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. माथेरानला घनदाट जंगलाचा विळखा आहे.

पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी येथे वाहनबंदी आहे. येथील खास वैशिष्टय असणारी रेल्वे पाहून अगदी गाण्यातल्या झुकझुक आगानगाडीची आठवण होते.

वाफेच्या इंजिनावर चालणारी ही गाडी माथेरानला नेता नेता आजूबाजूच्या मनोहारी निसर्गाचे दर्शन घडविते. ही रेल्वे जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आली आहे.

दार्जिलिंगच्या हिरव्यागार पर्वतराजीतून जाणार्‍या हिमालयीन रेल्वेचा अनुभव ही रेल्वे पर्यटकांना देते. झुकझुक चालणार्‍या या रेल्वेतून प्रवास करण्याचा आनंद अवर्णनीय.

माथेरान फिरायचे असेल तर पायी किंवा घोडयावरून फिरावे लागते. गाड्यांना बंदी असल्यामुळे हे प्रदुषण विरहीत ठिकाण आहे. येथे हार्ट पॉईंट, पे मास्टर पार्क पॅनोरमा, एकोहार्ट, वन ट्री हिल, मंकी, किंग जॉर्ज पॉईंट ही काही प्रसिध्द ठिकाणे आहेत. खरेदीसाठीही हे ठिकाण फार प्रसिध्द आहे.

जाण्याचा मार्ग-

माथेरान हे मुंबईपासून 110 तर पुण्यापासून 120 किलोमीटरवर आहे. उन्हाळ्यात येथे जाणे सर्वोत्तम.