बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. झळा दुष्काळाचा
Written By वेबदुनिया|

पाण्यासाठी जनता कासावीस

WD
कोरेगाव तालुक्यातील उत्तर व पूर्व भागातील सुमारे 50 ते 60 गावात पिण्याच्या पाण्याची कमी अधिक प्रमाणात टंचाई जाणवत असून अनेक ठिकाण्याच्या नळपाणी पुरवठा करणार्‍या पाणी योजना दुष्काळामुळे बंद पडल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना रात्रंदिवस भटकंती करावी लागत असून कोरेगाव तालुक्यातील उत्तर व पूर्व भागातील जनता पाण्यासाठी कासावीस झाल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान बड्या बागायतदारांपासून शेतमजूरांपर्यंत व ठोक व्यापार्‍यांपासून टपरी वाल्यापर्यंत सगळेच जण दुष्काळाच्या विळख्यात सापडले आहेत. उत्तर कोरेगाव भागातील अनेक गावात नोव्हेंबर पासून पाण्याचे टँकर सुरू आहेत. या भागातील विविध गावांच्या परिसरातील पाण्याच्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत.