मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. झळा दुष्काळाचा
Written By वेबदुनिया|

दुष्काळग्रस्तांसाठी मदत थेट बॅंकेत

WD
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी (दुष्काळ) आलेले देणग्यांचे धनादेश थेट बॅंकेत किंवा संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांत जमा करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

संबंधित विभागीय आयुक्त अथवा जिल्हाधिकारी कार्यालयांत महसूल उपायुक्त किंवा उपजिल्हाधिकारी यांच्याकडे मदतीचे धनादेश अथवा डिमांड ड्राफ्ट द्यावेत. हे धनादेश "मुख्यमंत्री सहायता निधी (दुष्काळ 2013) स्टेट बॅंक ऑफ इंडिया फोर्ट शाखा, खाते क्रमांक : एसबी 32860305777या नावाने देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धनादेश स्वीकारल्यावर देणगीदाराला कच्ची पावती दिली जाईल.