शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By नितिन फलटणकर|

पूनम महाजन फक्त दहावी पास, संपत्ती १२ कोटी

भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या पूनम ही फक्त दहावी पास असल्याची माहिती समोर आली आहे.

घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार म्हणून पूनम महाजन यांनी आज अर्ज दाखल केला. त्यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाल्याचे नमूद केले असून त्यांच्या नावावर १२ कोटी रुपयांची मालमत्ता असून ४.४० कोटी जंगम आणि ७.६८ स्थावर संपत्ती आहे.

उमेदवारी अर्ज भरताना पूनम यांच्याबरोबर त्यांचा भाऊ राहुल महाजन, काका प्रकाश महाजन व भाजपा-शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आपण आपल्या बहीणीचा प्रचार करणार असल्याचे यावेळी राहुल महाजनने सांगितले.