Last Modified: औरंगाबाद , मंगळवार, 29 सप्टेंबर 2009 (15:10 IST)
मनसेशिवाय सरकार स्थापणे अशक्य- राज
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठिंब्याशिवाय कोणताही पक्ष सरकार स्थापन करू शकणार नाही, असा दावा पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. एकदा महाराष्ट्राची सत्ता माझ्या हाती द्या राज्याला सुतासारखा सरळ करेन, असेही ठाकरे म्हणाले.
पैठणमध्ये आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. डॉ. सुनील शेंडे हे मनसेचे येथील उमेदवार आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या आघाडी सरकारने आणि शिवसेना-भाजप युतीने सामान्यांसाठी काहीही केले नाही. राज्यातले प्रश्न सोडविण्याऐवजी हे पक्ष वैयक्तिक फायद्यासाठी एकमेकांतच भांडत बसले अशी टीकाही त्यांनी केली.