शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By नितिन फलटणकर|

रिडालोससाठी निवडणुकीतून माघार- सुलेखा कुंभारे

काँग्रेसी राजकारणाचा बळी ठरलेले डॉ. राजेंद्र गवई हे तिसर्‍या आघाडीतून बाहेर पडल्यामुळे आघाडीचे विदर्भातील काम आता मलाच पाहायचे आहे. ही जबाबदारी योग्यरित्या पार पाडण्यासाठी यावेळी निवडणूक न लढण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे, अशी माहिती एकीकृत रिपब्लिकन पार्टीच्या नेत्या सुलेखा कुंभारे यांनी दिली.

दरम्यान, कालच रिडालोसची उमेदवारी यादी जाहीर झाली असून कामठी मतदारसंघासाठी सुलेखा कुंभारे यांचे नाव निश्चित करण्यात आले होते.

रिपाई ऐक्यामुळे कॉंग्रेसचे धाबे दणाणले होते. विधानसभा निवडणुकीतील पराभव काँगे्रसला आतापासूनच दिसू लागला होता. त्यामुळेच या पक्षाने रिपाइंच्या ऐक्यात बिघाड निर्माण करण्याचे घाणेरडे राजकारण खेळले. या राजकारणात डॉ. गवई बळी पडले.

दुसर्‍या पक्षांमध्ये किंवा आघाडीत फूट पाडून त्यांना कमकुवत करण्याची काँगे्रसची ही जुनी खेळी असली तरी आमच्या आघाडीला आपण कमकुवत होऊ देणार नाही. आघाडी मजबूत करणे हाच आपला एकमेव उद्देश असून, यासाठी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याचे सुलेखा कुंभारे यांनी यावेळी स्पष्ट केले.