शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By वेबदुनिया|

उपमुख्यमंत्री राष्‍ट्रवादीचाच- पवार

महाराष्ट्रातील जनतेने दिलेला कौल हा सेना-भाजप विरोधी असून, उद्धव यांच्यावर महाराष्ट्रातील जनतेने अविश्वास दाखवल्याने आपल्याला हा निर्णय अपेक्षितच होता असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार असल्याचेही पवार म्हणाले.

मुख्यमंत्रिपदाची आशा राष्ट्रवादीला नसल्याचे पवार यांनी कालच स्पष्ट केले होते, या मतांची आज पवार यांनी पुनरावृत्ती केली.

मतदारांनी दिलेला कौल हा सेना-भाजप विरोधी असून, जनतेचा या पक्षांवर विश्वास नसल्याचे सांगत पवार यांनी सेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

राज्यात स्थिर सरकार केवळ आघाडीच देऊ शकते हे या निकालांवरून स्पष्ट होत असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.