शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By वेबदुनिया|

'काँग्रेस-राष्‍ट्रवादीची घोषणा फसवणूक करणारी'

दारिद्रयरेषेखाली जीवन जगणार्‍यांना ३ रुपये किलो दराने गहू देण्याची घोषणा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी केली. ही घोषणा पूर्ण होणारी नसून जनतेची फसवणूक करणारी आहे. त्याऐवजी जीवन वेतनाची संकल्पना पुढे आणायला हवी, अशी सूचना भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. टिळक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.