शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By वेबदुनिया|

मुख्‍यमंत्र्यांवर चप्पलः आमदार पुत्रास अटक

मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या वाहनावर चपला व दगड फेकल्याच्या आरोपावरून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार व विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पुत्रासह १५० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विलासराव देशमुख यांचे समर्थक आमदार प्रताप पाटील चिखलीकर लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. मात्र ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्यामुळे शंकरअण्णा धोंडगे यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे नाराज झालेले आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शुक्रवारी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

त्याचवेळी धोंडगे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खुल्या जीपमधून मुख्यमंत्री अशोक चव्हाण आले, तेव्हा चिखलीकरांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या जीपवर चपला व दगडांचा मारा केला. याप्रकरणी पोलिसांनी काल रात्रीपासून चिखलीकर यांच्या १५० हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आमदारांचे पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर व त्यांच्या मित्रांनाही पोलिसांनी पहाटे तीन वाजता अटक केली.