शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By वेबदुनिया|
Last Modified: जालना , बुधवार, 30 सप्टेंबर 2009 (19:46 IST)

युतीमुळेच राज्यात वीजटंचाई- पवार

कष्ट करणार्‍या शेतकर्‍यांना थकबाकीदार ही पदवी मिळत आहे. अशावेळी शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेस आघाडीला विजयी करा असे आवाहन शरद पवार यांनी जाफ्राबाद येथे जाहीर सभेत बोलताना केले. भोकरदन - जाफ्राबाद मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांच्या प्रचारार्थ आज बुधवारी सकाळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी भाजप सेना युतीवर टीका केली.

युतीच्या सरकारच्या काळात एन्रॉन प्रकल्प बंद केल्यानेच आता वीजेची टंचाई निर्माण झाली आहे असे ते म्हणाले. राज्यात काँग्रेस आघाडी विजयी झाली तर भारनियमन कायमचे बंद करून दाखवू असे ते म्हणाले. केंद्रात जे सरकार असेल तेच राज्यात आले तरच विकास होवू शकतो त्यामुळे लोकांनी राज्यातही काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीला विजयी करावे असे ते म्हणाले.

युतीच्या काळात शेतकर्‍यांना पीक कर्जासाठी १२ टक्के व्याज ावे लागत होते ते आम्ही आता ६ टक्कयांवर आणले आहे असे ते म्हणाले. हे व्याज आणखी कमी करून ४ टक्के करू असेही त्यांनी सांगितले. या सभेत उमेदवार चंद्रकांत दानवे यांचे ही भाषण झाले. राजेश टोपे यांनी यावेळी बोलताना रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्रात घराणेशाहीचा बिहार पॅटर्न राबविला असल्याची टीका केली.