अमित राज ठाकरे उतरले मैदानात केले जनतेला हे आवाहन
मुंबई येथील मेट्रोचं कारशेड बनवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने आरे जंगलातील 2700 झाडं तोडण्याचा निर्णय घेतला असून, या विरोधात हजारो मुंबईकरांनी रस्त्यावर उतरुन याचा याचा जोरदार निषेध केला होता. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूसह अनेक सेलिब्रिटींनीही पाठिंबा दिला आहे. सोबतच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरेही आरेतील झाडे वाचवण्यासाठी सरसावले आहे. जनतेला सरकारच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरण्याचं अमित यांनी केले आहे.
अमित ठाकरे यांनी व्हिडियोच्या माध्यमातून आवाहन की "वृक्ष प्राधिकरण समितीने 2700 झाडे कापण्याचा निर्णय घेतला असून, बीएमसीचे अधिकारी, एमएमआरडीएने त्याअगोदर स्थानिकांशी चर्चा केली. त्यावर 82 हजार लोकांनी या विरोधात तक्रारी केल्या. एवढ्या लोकांच्या तक्रारी असतानाही आपण झाडे कापण्याचा निर्णय घेत असू तर संशय निर्माण होणारच. आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण निसर्गाचा बळी देऊन विकास करु नये. आपल्या मुंबईवरच नव्हे, तर जगावर ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे. अमेझॉन जंगल पेटल्याने सगळे जण हळहळ व्यक्त करत आहेत. आरे नष्ट करणं ही दुर्दैवी बाब आहे, लोकांनी पुढे येऊन याविरोधात आवाज उठवावा, मी तुमच्यासोबत आहे" असं आवाहन अमित ठाकरेंनी केलंय.