शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019 (16:12 IST)

क्रिकेटमध्ये बॉल दिसत असतो, भाजपला बॉल दिसला नाही : थोरात

गडकरी आमचे मित्र आहेत पण क्रिकेट आणि राजकारणात फरक आहे, क्रिकेट मध्ये बॉल दिसत असतो पण भाजपला बॉल दिसला नाही असा खोचक टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी गडकरींना लगावला आहे. 
 
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालांना खूप उशीरा भेटले, आम्ही आधीच राज्यपालांना भेटलो, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना  मदत करावी म्हणून आधी विनंती केली आहे. तसेत राज्यात लवकरच सत्ता स्थापन होईल, तुम्हाला जास्त वेळ थांबावं लागणार नाही. मुख्यमंत्रिपद, उपमुख्यमंत्रिपद याबाबत दिल्लीच्या स्तरावर निर्णय होतील असं त्यांनी सांगितले. 
 
तसेच आशिष शेलार यांनी राज्यात तीन अंकी नाट्याचा प्रयोग सुरु आहे अशी टीका महाशिवआघाडीवर केली होती. त्यावर तीन अंकी नाटकाचा शेवट त्यांना माहीत नाही, म्हणून बोलत आहे असा टोला बाळासाहेब थोरातांनी शेलारांना लगावला आहे.