1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019 (16:03 IST)

‘महासेनाआघाडी’ सरकार स्थापन करु देण्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

Petition filed in Supreme Court against allowing 'MahaSena Front' government to be formed
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना ‘महासेनाआघाडी’ सरकार स्थापन करु देण्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेचे नेते प्रमोद जोशी यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ‘निवडणुकांच्या निकालानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येऊन स्थापन केलेली आघाडी असंविधानिक आहे. निवडणूक प्रक्रिया आणि भारतीय संविधानासोबत ही गद्दारी आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात लक्ष घालून सरकार बनण्यापासून थांबवावं’ असं याचिकेत म्हटलं आहे. याचिकेत जोशींनी तिन्ही पक्षांना पक्षकार केलं आहे.
 
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये एकत्र येऊन आघाडी करण्याबाबत वाटाघाटी सुरु आहेत. सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र त्याआधीच या संभाव्य आघाडीला चाप लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली गेली आहे.