मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By

एक्झिट पोलचे आकडे राज ठाकरेंसाठी निराशाजनक

सोमवारी (21 ऑक्टोबर) राज्यात पार पडलेल्या मतदानानंतर आलेले सर्व एक्झिट पोलचे आकडे राज ठाकरे आणि मनसेसाठी मात्र निराशाजनक आहेत, कारण एक्झिट पोलमध्ये मनसेला कुठेही जागा पाहायला मिळाली नाही.
 
विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेनं राज्यभरात 101 उमेदवार उभे केले होते. राज यांनी पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद या ठिकाणी सभा घेतल्या होत्या. प्रचारात राज ठाकरेंनी सक्षम विरोधी पक्षासाठी मनसेला साथ द्या असं आवाहन केलं होतं. मात्र त्याचा कोणताही फायदा पक्षाला झाला नसल्याचं एक्झिट पोलमधून दिसून आलं.
 
कारण काही या एक्झिट पोलनुसार मनेसेनं माहिम, कल्याण ग्रामीण आणि कोथरूडमध्ये कडवी लढत दिली असली तरी तिथेही त्यांना विजय मिळण्याची शक्यता कमी आहे.