रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: मंगळवार, 10 सप्टेंबर 2019 (16:09 IST)

हे उलटे : भाजपचे माजी आमदार घोडमारे राष्ट्रवादीच्या वाटेवर

राष्ट्रवादीला गळती लागलेली असताना नागपुरमध्ये भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे. नागपुरातील भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची विजय घोडमारेंनी भेट घेतल्याची माहिती आहे. विजय घोडमारे हे 2009 मध्ये नागपुरातील हिंगणा विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. मात्र 2014 मधील विधानसभा निवडणुकांच्या वेळी विजय घोडमारे यांना उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे घोडमारे तेव्हापासून नाराज होते. आताही विधानसभेसाठी त्यांना पुन्हा तिकीट मिळणार नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे नाराज असलेल्या विजय घोडमारे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न सुरु केल्याची चर्चा आहे. यंदाही विद्यमान आमदार समीर मेघे यांनाच भाजप पुन्हा तिकीट देण्याची शक्यता आहे.