रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: बुधवार, 16 ऑक्टोबर 2019 (12:50 IST)

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वर चाकू हल्ला

उस्मानाबाद : शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर प्रचार सभेत तरुणाने चाकू हल्ला केला. या हल्ल्यात ओम राजे जखमी झाले आहेत. 
 
खासदार ओमराजे निंबाळकर हे शिवसेना उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी आले होते. ओमराजे प्रचार सभास्थळी पोहोचून गाडीतून उतरल्वार त्यांच्याजवळ एक तरुण आला आणि त्याने निंबाळकरांच्या हातात हात दिला आणि दुसऱ्या हाताने चाकूने पोटावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पवनराजेंनी हात अडवा धरल्यामुळे हातावर चाकूचा वार झाला. 
 
वार चुकल्यानंतर तरुण तेथून पळून गेला. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब इथं ही धक्कादायक घटना घडली.
 
ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांचे काही वर्षापूर्वी हत्या झाली होती. चक्क खासदारावर हल्ला झाल्याने उस्मानाबादसह राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. ओमराजे निंबाळकर 2019 मध्ये उस्मानाबाद मतदारसंघातून लोकसभा खासदार झाले.