मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 सप्टेंबर 2019 (10:03 IST)

मुलीवर दोन तरुणांचा चाकू हल्ला, त्यात नागरिक होते म्हणून ....

यवतमाळ ठिकाणी महिला सुरक्षित नाहीत हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. यवतमाळ  शहरातील बसस्थानक परिसरातील एका हॉटेलजवळ  एका १७ वर्षीय तरुणीवर चाकू हल्ला धक्कादायक घटना घडली. प्रकरणात दोन तरुणांनी एका 17 वर्षीय तरुणीवर चाकू हल्ला केला आहे. पोलिसांनी नंदकिशोर चौधरी या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. तर पीडित तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.
 
वर्धा येथील मुळची रहवासी असलेली 17 वर्षीय पिडीत हा यवतमाळमधील कनिष्ठ विद्यालयात शिकत आहे. तरुणी एका महिलेसह काही कामानिमित्त बसस्थानक परिसरात  गेली होती. बसस्थानकापासून काही अंतरावर असलेल्या  हॉटेलजवळ दोन दुचाकीस्वारांनी या तरुणीला पकडले, तरुणांनी तरूणीसोबत असलेल्या महिलेला ढकलून दिले आणि त्यानंतर तरुणीच्या पोटावर चाकूने वार केलं, मात्र  महिलेने प्रसंगावधान दाखवत मदतीसाठी  आरडाओरड केली.
 
पीडित तरुणी आणि महिलेचा आवाज ऐकून परिसरातील सर्वच नागरिकांनी याठिकाणी  धाव घेतली.  नागरिकांनी या चाकू हल्ला करणाऱ्या तरुणांना पकडले आणि जबरदस्त चोप दिला, मार खाल्लेल्या एकाने घटनास्थळावरुन पळ काढला आहे, दुसऱ्या तरुणाला नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केलं. नंदकिशोर चौधरी असं ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव आहे,  शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. हा हल्ला करण्यामागचं नेमकं कारण काय? याचा पोलीस शोध घेत आहेत.