संबंधित माहिती
- 'फेसबुक'वर राजकीय पक्षांचा 32 कोटींचा खर्च
- १९ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशकात सभा, १८ ला मुख्यमंत्र्यांच्या महाजानादेश यात्रेचा रोडशो
- उदययनराजे यांच्या दोन मुख्य अटी त्यामुळे भाजप प्रवेश लांबला
- उर्मिला यांचा राजीनामा नंतर कृपाशंकर सिह यांचा भाजपा प्रवेश निश्चित
- बुधवारी दिग्गज नेते करणार भाजपात प्रवेश
या तारखेला जाहीर होतील विधानसभा निवडणुका तारखा
निवडणुका तारखा कधी जाहीर होतील अशी उत्सुकता सर्वाना आहे. त्यात राजकीय पक्षांनी तर अनेक उमेदवार ठेवले सुद्धा आहे. मात्र आता सोमवारी म्हणजे 16 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत असे जवळपास निश्चित झाले आहे.
निवडणूक आयोगाची बैठक होत असून, बैठकीत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखा ठरवल्या जाणार आहेत सोबतच तारखांची घोषणा सोमवारी 16 सप्टेंबर रोजी होणार आहे. यामध्ये आपल्या महाराष्ट्रासह एकूण तीन राज्यांच्या निवडणुका पार पडणार आहेत.
यामध्ये महाराष्ट्र, हरियाणा ,झारखंडचा समावेश केला असून, महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणूक तारखा सोमवारी जाहीर होतील. तर झारखंडच्या निवडणुकांच्या तारखा नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतील. त्यामुळे आता लवकरच उत्सुकता संपणार असून, निवडणुकीचा धुराळा उडणार आहे.
