मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: बुधवार, 14 ऑगस्ट 2019 (10:09 IST)

राज्यसभा निवडणूक, मनमोहन सिंग यांचा राजस्थानमधून अर्ज दाखल

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राजस्थानमधून राज्यसभा सदस्यत्वासाठी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलट उपस्थित होते. भाजप प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांच्या निधनानंतर रिक्‍त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर 26 ऑगस्टला पोटनिवडणूक होणार आहे. संख्याबळामुळे काँग्रेसला पूर्ण विश्‍वास आहे. त्यामुळे मनमोहन सिंग यांचा विजय नक्‍की मानला जात आहे. मनमोहन सिंग यांचा राज्यसभेचा कार्यकाल १४ जूनला संपुष्टात आला होता. ते आसाममधून राज्यसभेवर निवडून गेले होते.