बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: शनिवार, 10 ऑगस्ट 2019 (16:55 IST)

महापुरामुळे विधानसभा निवडणूक पुढे ढकला : राज ठाकरे

महापुरासारखी घटना घडली तरीही हे सरकार दुर्लक्ष करतं आहे. राजकारण एके राजकारण करत बसायचं हेच या सरकारचं काम आहे अशीही खरमरीत टीका राज ठाकरे यांनी केली आहे. जी भीषण स्थिती आहे त्यातून सावरण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.
 
सांगली आणि कोल्हापूरमध्ये एवढी भीषण परिस्थिती निर्माण झालेली असताना यात्रांची नाटकं कसली सरकारकडून केली जात आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्या झाल्या तिथे लष्कर का पाठवलं नाही? जे नुकसान झालं आहे ते भरुन यायला, माणसं स्थिर व्हायला वेळ लागणार आहे. ऑक्टोबरमध्ये निवडणूक येते आहे. ती पुढे ढकलावी अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे. तसंच आपण यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.