शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019 (10:21 IST)

राज्यात युवकांची नवं मतदार म्हणून लाखो प्रमाणात नोंदणी

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानात 4 ऑक्टोबर 2019 पर्यंत नव्याने 4 लाख 90 हजार 50 मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील मतदारांची एकूण संख्या 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 अशी झाली आहे.
 
राज्यात पनवेल मतदारसंघात सर्वात जास्त म्हणजेच 5 लाख 57 हजार 507 मतदारांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 2 लाख 98 हजार 719 आहे तर महिला मतदारांची संख्या 2 लाख 58 हजार 605 इतकी आहे. सर्व्हिस मतदार म्हणून 173 पुरुष आणि 10 महिला मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. मतदार नोंदणी अभियानानंतर या मतदारसंघात एकूण 576 नव्या मतदारांची नोंदणी पूर्ण झाली असल्याने आता या मतदारसंघात एकूण 5 लाख 58 हजार 083 मतदार आहेत.
 
राज्यात वडाळा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजेच 2 लाख 03 हजार 776 मतदारांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 06 हजार 219 आहे तर महिला मतदारांची संख्या 97 हजार 515 इतकी आहे. सर्व्हिस मतदार म्हणून 40 पुरुष आणि 2 महिला मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. मतदार नोंदणी अभियानानंतर या मतदारसंघात एकूण 224 नव्या मतदारांची नोंदणी पूर्ण झाली असल्याने आता या मतदारसंघात एकूण 2 लाख 04 हजार इतके मतदार आहेत.