शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019 (15:21 IST)

मतमोजणी केंद्रांवर मोबाईल जॅमर बसवणार नाही: निवडणूक आयोग

स्टाँगरूम आणि मतमोजणी केंद्रांवर मोबाईल जॅमर बसवण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. मात्र मतमोजणी केंद्रांवर मोबाईल जॅमर बसवणार नाही, अशी स्पष्ट भूमिका निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी स्पष्ट केलं.
 
ईव्हिएम मशीन या फुलप्रुफ असून या मशीन्सना बाह्य यंत्रणांद्वारे हाताळता येऊ शकत नाही. त्यामुळे मतमोजणी केंद्र आणि स्ट्राँगरूममध्ये मोबाईल जॅमर बसवण्याच्या प्रश्नच उद्भवत नसल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी स्पष्ट केलं. आम्ही व्हिव्हिपॅट आणि ईव्हिएम मशीन्सबाबत सर्व ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम राबवले आहेत. तसंच त्यांचा इंटरनेटशी, वायफायशी कोणत्याही प्रकारे संपर्क होऊ शकत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत जॅमर लावण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही, असं सिंग यांनी स्पष्ट केलं.
 
ईव्हिएम आणि व्हिव्हिपॅटमशीन हॅक होण्याचा धोका असल्याने मतदानाच्या दिवसापासून मतमोजणीपर्यंत राज्यातील सर्व मतदान केंद्रे आणि स्ट्राँगरुमच्या ३ किमी परिसरात इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यावर आता निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण देत जॅमर बसवण्यात येणार नसल्याचं सांगितलं आहे.