गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019 (10:07 IST)

कोकणात शिवसेना माझ्यामुळे रुजली मात्र आता खासदार भाजपाचे होणार

नारायण राणे शिवसेनेवर टीका करायची कोणतीही संधी सोडत नाहीत. आता पुन्हा त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. नारायण राणे म्हणाले की, शिवसेनेला कोकणात मी आणलं व रुजवले पण या पुढच्या वेळी कोकणात दोन्ही खासदार भाजपाचे असणार आहेत. असं त्यांनी सांगितले. राणे पुढे म्हणाले की मी येत्या आठ दिवसांत आपण भाजपात प्रवेश करणार आहे. भाजप पक्षात प्रवेश करण्यासंबंधी माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे असे त्यांनी दावा केला आहे. सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते.
 
नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करत भाजपामध्ये जाण्याबाबत कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतलं. तेव्हा त्यांनी सांगितले की आज सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपल्यासोबत राहणार आहेत, तसंच येत्या आठ दिवसात भाजपामध्ये प्रवेश होईल असं त्यांनी सांगितलं आहे. राणे म्हणाले की, मी शिवसेना सोडली आणि माझ्यासोबत कार्यकर्तेही काँग्रेस पक्षात आले. त्यामुळे भाजपात जाईन तेव्हाही ते माझ्यासोबत असणार आहेत. भाजपात प्रवेश केल्यानंतर कोकणात पक्ष वाढवण्याचं काम आपण करु असं त्यांनी म्हटलं आहे.