शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. महाशिवरात्री
Written By

काय कुमारिकेने करू नये महादेवाची पूजा? जाणून घ्या यासंबंधित गोष्टी

देवांचे देव महादेव सर्वश्रेष्ठ देव आहे परंतू काय आपल्याला माहीत आहे का की महादेवाच्या पिंडीची पूजा करणे आणि पिंडीला स्पर्श करणे कुमारिकेसाठी निषेध आहे. काय आहे यामागील कारण जाणून घ्या:
 
लिंगम हे योनीचं प्रतिनिधित्व करतं तरी शास्त्रांमध्ये असा उल्लेख नाही. शिवपुराणात लिंग एक ज्योतीचे प्रतीक आहे. तरी समाजात प्रचलित धारणेनुसार शिवलिंगाची पूजा केवळ पुरुषांनी केली पाहिजे स्त्रियांनी नव्हे. तसेच अविवाहित स्त्रीसाठी शिवलिंगाची पूजा करणे पूर्ण पणे वर्जित आहे. असे का? जाणून घ्या मान्यतेनुसार अविवाहित स्त्रीला शिवलिंगाजवळ जाण्याची आज्ञा नाही. तसेच अविवाहित स्त्रीने शिवलिंगाची प्रदक्षिणा देखील घालू नये कारण महादेव अत्यंत गंभीर तपस्येत व्यस्त असतात.
 
महादेवाची पूजा करताना विधी-विधानाने पूजा करावी म्हणून देवता आणि अप्सरा देखील महादेवाची आराधना करताना काळजी घेतात. याचे मुख्य कारण महादेवाची तंद्रा. जेव्हा महादेवाची तंद्रा भंग होते ते क्रोधित होतात. म्हणूनच स्त्रियांनी महादेवाची पूजा करू नये.
 
याचा अर्थ तर कुमारिका महादेवाची पूजा करू शकतं नाही असे झाले. आणि आपणही हाच विचार करत असाल तर चुकीचं आहे. कुमारिकेने महादेवाची पूजा देवी पार्वतीसह करावी.
 
अनेक महिला 16 सोमवारचा व्रत करतात. या व्रतामुळे कुमारिकांना योग्य वर प्राप्ती होते आणि विवाहित महिलांना सौभाग्य प्राप्ती होते. तसेच सोमवार महादेवाचा वार असून या दिवशी योग्य वर प्राप्तीसाठी मुली उपास करतात. कारण तिन्ही लोकात महादेवाला आदर्श पती मानले गेले आहे. शिव सारखा पती मिळावा म्हणून अविवाहित स्त्रिया व्रत करतात.
 
वृषभ शिव वाहन आहे. वृषभचा अर्थ धर्म आहे आणि मनुस्मृतीनुसार 'वृषो हि भगवान धर्म:' अर्थात धर्माला चार पायांचा पशू मानले गेले आहे. त्याचे चार पाय धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे आहेत. महादेव या चार पायांच्या वृषभाची स्वारी करतात आणि धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष त्यांच्या अधीन आहेत.
 
महादेव चतुर्दशीचे स्वामी आहे. या दिवशी चंद्र सूर्याच्या अधिक जवळ असतो. सर्व भुताचे अस्तित्व नाहीसे करून परमात्मा अर्थात महादेवाशी आत्मसाधना करण्याची रात्र शिवरात्री आहे.
 
शिवरात्री पूजा संबंधात भारतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या मान्यात आहेत. दक्षिण भारतात मंदिरात पूजा केवळ पुजारी करू शकतात. इतर भक्तांना पूजा करण्याची परवानगी नसते.
 
घरगुती पूजेत दक्षिण भारतात पुरुष महादेव किंवा शालिग्रामचा अभिषेक करतात तसेच महिला अभिषेकसाठी अर्पित करण्यात येणार्‍या वस्तू पुरुषांना देण्याचं काम करतात.