बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By

मकर संक्राती: स्नान, सूर्य आराधना आणि तिळाचे महत्त्व

* मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वांनी अर्थात स्त्री असो वा पुरुष, सूर्यादयापूर्वी आपला बिछाना सोडून स्नान करावे.
या दिवशी तीळ स्नानाचं अत्यंत महत्त्व आहे. याने रूप आणि आरोग्य लाभतं.
* तिळाचे उटणे लावून स्नान केल्याने आरोग्य प्राप्ती होते.
* या दिवशी तीर्थ स्थळी, मंदिर, देवळात देव दर्शन करणे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचेही विशेष महत्त्व आहे.
* या दिवशी स्नान झाल्यावर सूर्य देवतेची पूजा आराधना करावी.
* तांब्याच्या लोट्यात पाण्यात कुंकू, अक्षता, तीळ आणि लाल रंगाचे फूल घालून सूर्याला अर्घ्य द्यावे. याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.
* सूर्याला अर्घ्य दिल्यावर या दिवशी पाण्यात तीळ घालून पितरांना जल अर्पित करावे.
* या दिवशी दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी वस्त्र, तूप, डाळ-तांदळाची कच्ची खिचडी आणि तीळ दान करण्याचे विशेष महत्त्व आहे.
* नंतर पूर्व दिशेकडे मुख करून बसावे. समोर चौरंगावर पांढरा रंगाचा वस्त्र पसरवून त्यावर सूर्यदेवाचे चित्र, प्रतिमा किंवा यंत्र स्थापित करावे.
* पंचोपचार पूजन करून गुळाचा नैवेद्य दाखवावा. 
* पूजनात लाल फूल वापरावे. नंतर लाल चंदनच्या माळणे या मंत्राचा जप करावा.
ऊँ भास्कराय नम: ।।
ऊँ घृणि सूर्याय नम: ।।
* असे संक्रांती व्यतिरिक्त दर रविवारी केल्याने सूर्य दोष नाहीसा होतो.
* या दिवशी गरिबांना भोजन खाऊ घातल्याने कधीही धनाची कमी होत नाही.
* या दिवशी गूळ आणि कच्चे तांदूळ पाण्यात प्रवाहित करणे शुभ मानले गेले आहे.
* या दिवशी खिचडी, तीळ-गूळ आणि शिजवलेल्या तांदळात गूळ आणि दूध मिसळून खाण्याने सूर्यदेव प्रसन्न होतात.
* या दिवशी स्वच्छ लाल कपड्यात गहू आणि गूळ गुंडाळून ब्राह्मण किंवा गरजू माणसाला दान केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
* या दिवशी तांब्याचा शिक्का किंवा तांब्याचा तुकडा पाण्यात प्रवाहित केल्याने सूर्य दोष कमी होतो.
* या दिवशी तिळाने हवन करणे, तीळ खाऊ घालणे आणि तीळ दान केल्याने पुण्य लाभतं.
* या दिवशी हातात काळे तीळ आणि गंगाजल घेऊन संकल्प करावे आणि आपल्या चुकांसाठी महादेवाला प्रार्थना करावी.
* या दिवशी गायीला तीळ मिसळलेली खिचडी खाऊ घातल्याने शनी तसेच सर्व ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होतो.