Makar Sankranti 2023 मकर संक्रांती 2023 14 की 15 जानेवारी? मुहूर्त जाणून घ्या
तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणत मकर संक्रांती सण साजरा केला जातो. नवीन वर्षातला हा पहिला सण खूप उत्साहाने साजरा केला जातो. दरवर्षी मकर संक्रात हा सण 14 जानेवारी रोजी साजरा करतात. परंतु यंदा 2023 साली मकर संक्राती 15 जानेवारी रोजी उदयोतिथीनुसार साजरी केली जाणार आहे.
Makar Sankranti 2023 Date
हिंदू दिनदर्शिकेनुसार 2023 मध्ये मकर संक्रांती सण रविवारी 15 जानेवारी रोजी साजरा केला जाईल.
14 जानेवारी रोजी रात्री 8 वाजून 21 मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल म्हणून उदय तिथीनुसार 15 जानेवारी रोजी मकर संक्रांती साजरी केली जाईल.
मकर संक्रांती पुण्यकाळ मुहूर्त Makar Sankranti 2023 Muhurat
मकर संक्रांती पुण्यकाळ मुहूर्त सकाळी 7 वाजून 15 मिनिटे ते दुपारी 12 वाजून 30 मिनिटापर्यंत असेल.
एकूण कालावधी 5 तास 14 मिनिटे आहे.
मकर संक्रांती महापुण्य मुहूर्त Makar Sankranti 2023 Muhurat
महापुण्य काळ 7 वाजून 15 मिनिटे ते 9 वाजून 15 मिनिटापर्यंत आहे.
महापुण्याचा एकूण कालावधी 2 तासांचा असेल.
मकर संक्राती पूजा विधी Makar Sankranti 2023 Puja Vidhi
संक्रांतीला सुगडाची पूजा केली जाते. सुगड हे काळ्या आणि तांबड्या रंगाच्या मातीचे असतात. यात शेतात पिकलेलं नवं धान्य ठेवून पूजा करण्याची पद्धत आहे.
सुगडाला हळद-कुंकुवाच्या उभ्या रेषा लावल्या जातात. सुगडात खिचडी, हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ हे साहित्य भरलं जातं. देवासमोर चौरंग मांडून छान रांगोळी काढली जाते. त्यावर रेशीम वस्त्र पसरवून तांदूळ किंवा गहू ठेवून त्यावर सुगड ठेवून त्यांची पूजा केली जाते आणि देवाला सुगडाचे वाण दिलं जातं. तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवला जातो.
अनेक ठिकाणी सुवासिनी हळद कुंकु समारंभ करत सुगड दान करतात. दे वाण घे वाण करतात. तिळगूळ देतात आणि आवा लुटतात म्हणजे भेटवस्तू एकमेकांना देतात. नात्यात गोडवा निर्माण व्हावा म्हणून हा सण साजरा केला जातो.