रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By

मकरसंक्रांत स्पेशल गुळाची पोळी Gulachi Poli

gud ki roti
गुळ पोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य - 
अर्धा किलो गुळ (चिकीचा गुळ नसावा), तिळाची पूड- अर्धी वाटी, डाळीचे पीठ- अधी वाटी, 10 वेलदोडे, तेल- अर्धी वाटी, कणिक, तेलाचे मोहन- पाव वाटी 
 
गुळाच्या पोळीची कृती
तीळ स्वच्छ करुन भाजून गार करून बारीक कुटू तयार करा. वेलदोड्याची पूड तयार करा.
गुळ किसून घ्या त्यात भाजलेले डाळीचे पीठ, तिळाची पूड, वेलदोडा पूड घालून मिश्रण एकजीव करा. 
कणिक चाळून घ्या. त्यात तेलाचे मोहन घालून घट्ट भिजून घ्या. 
तेलाच्या हाताने मळून ठेवा. कणकेचे दोन गोळे घ्या. एका गोळ्याच्या आकाराप्रमाणे गुळ घ्या.
तिन्ही पाऱ्या जरा जरा लाटून पहिल्या पारीवर गुळाची पारी नंतर पुन्हा कणकेची पारी ठेवा. 
किंचित कडे दाबून पातळ पोळी लाटा. 
पोळी चांगली खमंग भाजून घ्या.
 
विशेष टिपा: 
गुळाच्या पोळीसाठी तयार केलेलं गुळ एक महिनाभर टिकतं.
गुळाच्या पोळ्या देखील साधारण पाच दिवस तरी चांगल्या राहतात.
पोळी लाटताना गुळ बाहेर येऊ नये याची काळजी घ्यावी.
पोळी भाजताना तव्यावर चमच्याने थोडेसे तेल किंवा तूप सोडता येतं.
पोळी तव्यावर फुटल्यास फडकं पाण्यात भिजवून तव्यावरून फिरवून घ्या ज्याने पुढच्या पोळीला डाग पडत नाही.
भाजलेल्या पोळीवर तुपाचा गोळा घालून सर्व्ह करता येतं किंवा तव्यावरच तुप लावून पोळी भाजता येते.