मंगळवार, 5 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By
Last Modified: रविवार, 15 जानेवारी 2023 (09:52 IST)

संक्रांतीच्या शुभेच्छा: द्यावा तिळगुळ, प्रेम सर्वत्र पसरवावे

makar sankrant kite
सुर्यदेवाचे मकर राशीत संक्रमण असते,
दानाचे अतीव महत्व ही संक्रांती स असते,
द्यावा तिळगुळ, प्रेम सर्वत्र पसरवावे,
सौभाग्यवतीस हळदीकुंकू अन वाण द्यावे,
बालगोपाळा ची लूट हौसेने करावी,
नव्यानवरीची खुशी, सण साजरा करून व्हावी,
करावे हलव्याचे सुंदर दागिने  तयार,
पतंग उडवून आपण ही हवेवर व्हावं स्वार,
तीळ तीळ वाटून करावं पुण्याचे काम,
स्नान करून पवित्र नदीत, घ्यावं सुर्यदेवाचे नाम!
...अश्विनी थत्ते