मंगळवार, 5 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. मंगळ देव
Written By
Last Modified: सोमवार, 17 एप्रिल 2023 (11:33 IST)

श्री मंगळग्रह मंदिरास भाविकाकडून कूलर भेट

अमळनेर : तप्त उन्हापासून मंदिरात दर्शन, अभिषेकासाठी येणाऱ्या भाविकांना काहीसा गारवा मिळावा, या उद्देशाने एका भाविकाकडून श्री मंगळग्रह मंदिरास दानरूपाने कूलर भेट देण्यात आले.
 
सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने एप्रिलमध्येच 'मे हीट'ची चाहूल लागली आहे. या पार्श्वभूमीवर कडक उन्हापासून मंदिरात येणार्‍या भाविकांची गैरसोय दूर होऊन त्यांना गारवा मिळावा, या हेतूने निमडाळे (ता.जि. धुळे) येथील रहिवासी चेतन पाटील यांनी रविवार, 15 एप्रिल रोजी श्री मंगळग्रह मंदिरास नवीन कूलर भेट दिले. दरम्यान, भाविकांना उन्हापासून कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये,  यासाठी मंगळग्रह सेवा संस्थेच्या विश्वस्त मंडळींकडून कायम दखल घेतली जात असते.