1. धर्म
  2. हिंदू
  3. मंगळ देव
Written By
Last Updated : गुरूवार, 9 फेब्रुवारी 2023 (20:21 IST)

१६ वर्षांनंतर मंगळग्रह देवाच्या मूर्तीचे वज्रलेपन

vajra lep
विश्वातील एकमेव अतिप्राचीन व अतिदुर्मीळ असलेल्या व अगणित भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या येथील मंगळग्रह देवाच्या मुर्तीवर माघी पौर्णिमेचे औचित्य साधून सहा तासात विधीवत पुजा करून वज्रलेपनकरण्यात आले. मुर्तीला नव्याने रंगरंगोटीही करण्यात आली आहे .त्यामुळे मूर्ती आता पूर्वीपेक्षाही खूप जास्त दिव्य व तेजस्वी दिसू लागली आहे.
 
मंगळ ग्रह देवाची मुर्ती प्राचीन असल्याने मुर्तीची झिज होऊ नये, यासाठी वेळोवेळी मूर्तीवर आवश्यक तेथे व तेंव्हा वज्रलेपन केले जाते .१३ वर्षापुर्वी पुण्यातील सुप्रसिध्द कारागीर राजाभाऊ सोमवंशी यांनी वज्रलेपन केले होते.
 
येथे झाले आहे आतापर्यंत वज्रलेपन
वेरूळ येथील जगप्रसिध्द कोरीव लेणी, बारावे ज्योतलिंग श्री घृष्णेश्वर मंदिर, एकविसावे गणेशपीठ श्री लक्षविनायक गणपती, दिगंबर जैन मंदिर, शादावल मालिक दर्गाह, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ मालोजीराजे भोसले यांच्या पाटीलकीचे गाव अशा आठशे वर्षांपेक्षा अधिक मुर्तीच्या झीज झाली होती. या सर्व मुर्तीचे राजाभाऊ सोमवंशी यांनी वज्रलेपन केलेले आहे. सोमवंशी यांचा हा वडलोपार्जित व्यवसाय आहे. त्यांचे सुपुत्र हर्षल सोमवंशी यांनी पंधरा वर्षापुर्वी च वडिलांकडून वज्रलेप करण्याची कला अवगत केली होती. वडिलोपार्जित वसा कौशल्यपुर्णतेने पुढे नेत हर्षल यांनी आतापर्यत भवानी शंकर, राजदुर्ग, केदारनाथ, शिरकाई देवी, नागनाथ महाराज तसेच महाराष्ट्रासह विविध राज्यातील मुर्तीचे व्रजलेपन केले आहे.
 
असे केले जाते वज्रलेपन
मुर्तीची झिज होऊ नये तसेच मुर्तीला नवीन झळाळी यावी, यासाठी वज्रलेप न करण्यात येते .वज्रजेपन करणे ही पुरातन भारतीय कला आहे. नैसर्गिक रसायनांचा वापर करून अथक परिश्रमाने वज्रलेपन केले जाते . 
वज्रेलप करण्याची कला दिवसेंदिवस दुर्मिळ होऊ लागली आहे. सोमवंशी परिवाराची दुसरी पिढी वज्रेलपन करण्याचा व्यवसाय गावोगावी जाऊन करीत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात राष्टकुट, यादव, चालुक्य काळातील देव देवतांच्या मुर्ती आढळून आलेल्या आहेत.
 
खान्देशात ११ ते १२ व्या शतकातील मुर्तीचा समावेश
अंबाडे , पारोळा, सातेगाव, भुसावल, अमळनेर, नंदूरबार, संभाजीनगर ,जळगाव व नाशिक जिल्हयात अनेक ठिकाणी मुर्तीचे वज्रलेपन यापूर्वी गरजेप्रमाणे झाले आहे . त्या सर्व मुर्त्या बहूतांश ११ व १२ व्या शतकातील असल्याचा दावा हर्षल यांनी केला आहे.  
येथे वज्रलेपनकरतांना हर्षल याना त्यांचे सहकारी प्रशांत चव्हाण, दुष्यात चव्हाण तसेच मंदिराचे पुरोहित जयेंद्र वैद्य, गणेश जोशी यांनी सहकार्य केले .
 
अमळनेर येथील जेष्ट पुरोहित केशव पुराणिक यांच्यामते आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे भग्न किंवा तूट-फूट झालेल्या मुर्तीची पूजा करता येत नाही. या पार्श्वभूमीवर अनादी अनंत काळापासून भारतीय कारागिरांना ज्ञात असलेली सदर मूर्तीवर वज्रलेपन क्रिया करणे उत्तम पर्याय आहे.